माझा शेतकरी
आज पेपर वाचायला घेतला आणि काळजात चर्र झालं....बातमी अशी होती की ‘पंचनाम्यासाठी 500 रुपये दिले नाही म्हणून गारपीटग्रस्त शेतकर्याला बेदम मारहाण’….
अरे काय चाललेय काय या देशात ???....शेतीप्रधान देशामधे शेतकर्याचीच अवस्था लाचारांसारखी करून ठेवलीये...समाजातील ज्या घटकाकडून तुम्हाला 2 वेळचे गिळायला मिळतय त्याची अशी फरफट करताय तुम्ही..तूम्हाला समाज तरी कसं म्हणायच..मेलेल्या मानसाच्या टाळूवरचे लोणी खाणार्या औलादी आहेत या .. सत्ता दिली म्हनून तुम्ही खालेल्या ताटात घाण करणार का ??.आणि हे सगळं निमूटपणे सहन करणार्या शेतकर्याला शेवटी काय मिळतं तर अपमान ,हालअपेष्टा ..कष्टाचा मोबदला मिळायला त्याला वर्ष घालवायला लागतं....वर्षभर कष्ट करून 2 पैसे देऊन त्याची बोळवण केली जाते...
हा कसला देश आहे आपला ..ज्या देशाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे त्या देशाला शेतकर्यांच्या कष्टाच ,गरजांच ,संकटांच काहीच सोयरे सूतक नाही...
राज्यकर्ते ,प्रशासन जाऊदे हो चुलीत,,,त्यांना काय पैसा आणि सत्ता या दोनच गोष्टी महत्वाच्या ,,,,,पण सभ्य म्हणून घेणार्या आपल्याच आसपासच्या समाजाला,शहरवासीयांना,नोकरदारांना शेतकर्याविषयी साधा आदर देखील असू नये ही बाब किती खेदजनक आहे ...यांना शेतकर्यांचे मातीने बरबटलेले हात दिसतात ,मळलेले शरीर दिसतं, उन्हाने कळवंडलेले शरीर दिसतं पण कष्ट दिसत नाही...आदर लांबच यांना किळस वाटतो शेतकर्याचा ...
आणि याच समाजक्ंटकांच्या कुत्सित नजरांमुळे आज आपलीच शेतकर्यांची पोर आपला बाप शेतकरी आहे हे सांगायला चक्क लाजतात..!!!!!कीती भयानक परिस्थिति आहे ,..जगाला पोसायचा विडा उचलणार्या शेतकर्यांच्या पोरांना त्यांच्या बापाची लाज वाटते..!!..मला आपल्या शेतकर्याच्या अशा पोरांबद्दल वाईट वाटते पण राग नाही येत अन मी त्यांना दोषही देणार नाही कारण आपल्याच आजुबाजूच्या समाजातून आपल्या बापाला मिळणारी किम्मत त्याने पाहिलेली असते ..त्याची समाजात काय प्रतिष्ठा ठेवली जाते तेही त्याने पाहिलेले असते....मग त्यांना दोष तरी कसं द्यायचा नाही का ?
आज आमचेच शेतकरी आई बाबा आम्हाला सांगतात “बाळा शेतकरी नको हा होऊ साळा सिक आणि नोकरी कर शेतीत काय बी नय राहयले आता ”....कारण स्पष्ट आहे कारण कुत्र्याला भाकरी द्यायला जावं आणि त्यांनच आपला हात चावावा अशी परिस्थिती आहे बाहेर ,,म्हणजे शेतकरी या समाजाला भाकरी देतो आणि तोच समाज त्यांची अवहेलणा करतो ...
पण मी अशा मुर्दाड लोकांना सांगू इछितो की पिसळलेल्या कुत्र्याच काय करायच असतं ते शेतकर्याला चांगलं कळतं ...तेंव्हा त्यांचा अंत नका पाहू…

झेंब्या तावडे
छान विचार मांडलेत.
उत्तर द्याहटवा